उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पंढरपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार
पंढरपूर (प्रतिनिधी) दि.22 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस पंढरपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संकल्पनेतून " अजित वनराई " या माध्यमातून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील पटवर्धनकुरोली, भाळवणी, गादेगांव, चळे या प्रमुख गावांमध्ये अनुक्रमे दि.22,24,27 व 29 जुलै रोजी मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन तसेच चष्मांचे वाटप करण्यात येणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन काळे यांनी केले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळूंखे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांचेसह राष्ट्रवादीचे विविध फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे काळे यांनी सांगीतले.