एमबीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

0
एमबीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस  मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
       बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला शासनाने मुदतवाढ दिली असून सुधारित वेळापत्रकानुसार आता शनिवार, दि.२७ जुलै २०२४ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व निश्चिती (कन्फर्मेशन) करण्यासाठी रविवार, दि.२८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत मुदत दिली आहे. एम.बी.ए. प्रवेशासाठी कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच एमएएच- एमबीए सीईटी २०२४ ही अथवा तत्सम परीक्षा दिलेली असावी. स्वेरीच्या एम.बी.ए. विभागाचे हे यंदाचे १६ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी नोकरीसाठी विविध पदांवर रुजू होतात. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध आहे. या प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीतीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील (मोबा. नंबर– ९५९५९२११५४) व एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ. कमल गलानी (मोबा. नंबर– ९०२८३०३०७७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !