पंढरीतील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा मा.आ. परिचारक यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

0
पंढरीतील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा मा.आ. परिचारक यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

पंढरपूर- आषाढी वारीच्या नावाखाली पंढरपूर शहरातील अनेक दुकानदारांची लहान मोठी दुकाने अतिक्रमणात काढण्यात येत असून यामुळे व्यापारी अक्षरशः उघड्यावर आले आहेत. 
आषाढी वारीवरच पंढरपूर शहरातील व्यावसायिक नागरिकांचे संसार चालत असल्याने अतिक्रमण कारवाई थांबवावी अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.
पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविक भक्त व वारक्यांना ये-जा करणेसाठी अडथळा येत असेल तेथील अतिक्रमण काढवे परंतू पंढरपूरातील व्यावसायिक हे वर्षानुवर्ष एकाच ठिकणी आहेत जे बाहेरगावाहून येणारे व्यावसायिक रस्त्यावर, फुथपातवर बसतात त्यांचे अतिक्रमण न काढता स्थानिक व्यावसायिक यांचे अतिक्रमण काढले गेले व गरज असेल त्याठिकाणीच अतिक्रमण काढणे गरजेचे असून सरसकट व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये.
पंढरपुरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमे बाबत प्रशांत परिचारक यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती मांडली. यावेळी परिचारक यांनी शिंदे यांना निवेदन देखील दिले आहे. यामध्ये वर्षातील सर्वात मोठ्या आषाढी वारीचे नियोजन प्रशासनाकडून सुरू असून याचाच एकभाग म्हणून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण काढण्यात येत आहे. मागील चार दिवसापासून रस्त्याच्या बाजुला असणारी खोकी, दुकानाची पानसर, पायऱ्या काढण्यात येत आहेत. यामुळे लहानसहानं व्यवसाय करून कुटुंब चालविणाऱ्या व्यापाऱ्यांची, हातावरचे पोट असलेल्या नागरिकांची रोजीरोटी बंद पडली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देताच सदर कारवाई करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वास्तविक पंढरपूरची अर्थव्यवस्था अजूनही वारीवर चालणारी असून यामध्ये आषाढी ही सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होणारी वारी आहे. यामुळे अतिक्रमण हटाव मोहिम राबविताना व्यापाऱ्यांकडे माणुसकीच्या दृष्टीने पहावे अशी विनंती परिचारक यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
पंढरपूर शहरातील अतिक्रमण मोहिम स्थगित करून स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणी प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !