दि.पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर बँकेमार्फत "आई" योजनेचा उपक्रम

0

दि.पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर बँकेमार्फत "आई" योजनेचा उपक्रम

 महिला उद्योजकांसाठी अर्थकारणाच्या माध्यमातुन महिलांची प्रगती व्हावी

 पंढरपूर 16:-

 

          दि.पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर नवीपेठ, खवा बाजार येथील कर्मयोगी सभागृह येथे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम "आई" महिला केंद्रीत पर्यटन धोरणा अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजना उद्घाटन मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात बँकेचे चेअरमन मा.श्री.सतीश मुळे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलनाद्बारे करणेत आली.


कार्यक्रमाचे सुरवातीस "आई" महिला केंद्रीत पर्यटन धोरणा अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजनेची माहिती मा.डॉ.संगिता पाटील यांनी दिली. या कार्यक्रमास पंढरपूरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजीकांचे सक्षमीकरण करण्यासाठी "आई" महिला केंद्रीत पर्यटन धोरणा अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजना (फक्त महिलांसाठी) राबविण्यात येत आहे. या योजनेतून कृषी पर्यटन केंद्र, हॉटेल व्यवसाय, रेस्टाँरंट, फॅके, उपहार गृह, फास्ट फूड, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, टूर ट्रॅव्हल्स एजन्सी, हाऊस बोट, टेंट हाऊस, पर्यटन व्हिला, साहसी पर्यटन केंद्र, होम स्टे, रिसॉर्ट, ट्री हाऊस, आदिवासी/निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, मेडीकल पर्यटन, वेलनेस सेंटर, योगा केंद्र असे पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो.

"आई" महिला केंद्रीत पर्यटन धोरणा अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजनेअंतर्गत 15 लाख पर्यंतच्या कर्ज रकमेवर पर्यटन विभागाच्या वतीने रू. 4.50 लाख पर्यंत (12 टक्केच्या मर्यादेत) व्याजाचा परतावा हा लाभार्थ्याला त्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत आधारकार्ड, पॅन कार्ड, शॉप ॲक्ट, उद्योग आधार, प्रकल्प अहवाल,  LOI  पात्रता प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.हरीष ताठे यांनी केले तर आभार मा.श्री.गणेश हरिदास व मा.श्री.निरजंन रूपलग यांनी केले.

याप्रसंगी बँकेचे चेअरमन मा.श्री.सतिश मुळे, संचालक मा.श्री.हरिष ताठे, मा.श्री.अमित मांगले, मा.श्री.ऋषिकेश उत्पात, मा.डॉ.संगिता पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.उमेश विरधे, मा.श्री.आनंदा नाईकनवरे कर सल्लागार व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !