पंढरपूर येथे धनगर समाजाची विविध मागण्यासाठी उद्रेक बैठक
प्रतिनिधी
पंढरपूर आज पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक झाली या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील व सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे
व एकादशीच्या अगोदर याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच पंढरपुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भावनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी मिळावा अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी वर्ग करण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभा करण्याचे ठरविण्यात आले धनगर समाजामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला गेल्या लोकसभेला धनगर समाजाने महायुती सरकारला दाखवून दिलेले आहे धनगर समाजाचा पूर्ण विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभेलाही याचे परिणाम भोगावे लागतील आशा सूर या बैठकीतून दिसून आला या बैठकीचे नेतृत्व सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी माऊली हळणवर, अमोल बापू कारंडे सुभाष मस्के सर आदित्य फत्तेपूरकर सोमनाथ ढोणे संतोष बंडगर प्रशांत घोडके मक्कन्ना बाराचारी महेश खसगे आप्पा पुजारी बंडू पुजारी प्रवीण सलगर महेश गुंडे दादा खटके दादा कोळेकर संजय माने अमोघ सिद्ध पाटील संजय लवटे बाजीराव खडके विजय चोरमले श्री सिताराम मेटकरी सूर्यकांत येजगर ज्ञानेश्वर गुंडगे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते