मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी बजावला पंढरपुरात मतदानाचा हक्क
दोन लाखाहून अधिक मताधिक्याने महायुतीचा उमेदवार विजयी होईल : दिलीपबापू धोत्रे
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
पंढरपूर शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदार जनता उस्फूर्तपणे बाहेर पडत आहेत. हा उत्साह पाहता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजयी हि निश्चित आहे.
त्यामुळे महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांचा दोन लाखाहून अधिक मताधिक्याने विजय होईल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन केले.