निवडणूका होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

0
निवडणूक होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांसाठी मागणी

चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी करून दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या सूचना

पंढरपूर प्रतिनीधी /-


लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साथ दिली होती. त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या सभासदांसाठी करण्याबाबतची भूमिका घेत , शासन दरबारी विविध प्रश्न मांडण्यासाठी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पिण्याचे पाणी सोडून भीमा नदीकाठचा वीजपुरवठा किमान आठ तास करण्यात यावा. ही पहिलीच मागणी करताच त्यावर तात्काळ दखल घेत वीज पुरवठा ८ तास करण्यास सूचना दिल्या..
मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री विठ्ठल सहकारी
साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन, वरील मागणीचे निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेतली असल्याचे दिसून आले आहे.

राज्यामध्ये गतवर्षी पाऊसमान अत्यल्प झाला आहे सध्या उन्हाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी अहोरात्र मेहनत करून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असून अशा तीव्र उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. सध्या भीमा नदीकाठचा वीज पुरवठा २ तासच असल्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके करपु लागल्याचे दिसत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

भिमा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन ह्या नदीपासून १५ ते २० हजार फुट अंतरावर असल्यामुळे कमी वेळेत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे जनावरांस पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर हा विद्युत पुरवठा २ तासा ऐवजी ८ तास सुरू ठेवल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल, सदर वीज पुरवठ्याची वेळ वाढविणेबाबत वारंवार शेतकऱ्यांकडून मागणी होत होती.यामुळे  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  अभिजीत  पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केली असता, त्यावर संबंधिताना आदेश देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा मंगळवार पासून सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्याची अडचण दूर होणार आहे.


यावर्षी पाऊस चांगला आहे.नदीत आलेले पाणी किमान २ महिने पुरेल पण लाईट नसेल तर पाणी असून काही फायदा शेतकर्‍याला होणार नाही. पाणी वाया जाईल व उभी पीके जळून जातील. त्यामुळे सध्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आपण हि मागणी केली होती. याची दखल उपमुंख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी घेत पिण्याचे पाणी ठेऊन शेतीस लाईट सुरु करण्याच्या सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !