भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली - आमदार प्रणिती शिंदे

0
भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली - आमदार प्रणिती शिंदे

भाजपमध्ये लोकशाहीला दृष्टी लागली. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे बिघडवायला निघाले आहेत. म्हणून हे लोक आपली संस्कृती परंपरा आपली एकी बिघडवत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा अंत करत असतील. आरक्षणासाठी हे बोलायला तयार नाहीत. ही खरी लोकशाहीची परीक्षा असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. हुलजंती येथे सभेत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे. आज शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी प्रणिती शिंदे यांनी बोराळे, मरवडे, हुलजंती सलगर बुद्रुक पंचायत समिती गण दौरा केला. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी सोलापूर जिल्ह्यात म्हणून शब्द दिला आहे पहिला आवाज लोकसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी असेल. पहिला आवाज पाण्यासाठी आणि आरक्षणासाठी असेल. मी कामाची पक्के आहे. मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आले नाही. मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे. ही निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा आहे, असे यावेळी प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार

मी प्रतिज्ञापत्र तयार केले असून हे प्रतिज्ञापत्र दोन दिवसात तुमच्यासमोर जाहीर करणार आहे. दरम्यान, मी सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणारच. सोलापूर जिल्हा लोडशेडिंगमुक्त करणार.  शेतकऱ्यांना एमएसपी मिळवून देणार आणि कर्जमुक्त करणार. प्रत्येक गावात येणारा रस्ता मी करणार, सोलापुरात  युवकांसाठी आयटी पार्क आणि नोकरीसाठी उद्योग आणणार, असे आश्वासन यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान मी हे काम नाही केले तर, कान धरून खाली बसवण्याचा अधिकार देखील तुम्हाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

यावेळी कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, दिलीप जाधव, फिरोज मुलाणी, चंद्रशेखर कौडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, प्रा.येताळा भगत, प्रथमेश पाटील, हणमंत दुधाळ, साहेबराव पवार, पांडुरंग चौगुले, पांडुरंग जावळे, दौलत माने, दादा पवार, साहेबराव पवार, पै.दामोदर घुले, मनोज माळी रविकरण कोळेकर, राजाराम जगताप, तुकाराम भोजने, अजय अदाटे पांडुरंग निराळे बापू अवघडे नाथा ऐवळे सुनीता अवघडे आदीसह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !