प्रणिती शिंदेच्या माध्यमातून सोलापूरचा आवाज पार्लमेंट मध्ये पोहोचवा - एम बी पाटील.
४०० तर सोडाच २०० आकडा ही पार होणार नाही.
मोदींनी १६ लाख कोटी उद्योजकांना उद्योजकांना माफ केले तोच पैसा आम्ही गरीबात वाटू. मोदी लाटेचा मुखवटा गळून पडला आहे.
सोलापूर प्रतिनिधी.
सोलापूरची रणरागिणी विधानसभेपूर्ती मर्यादित न ठेवता या लढवय्या प्रणिती शिंदे यांना सोलापूरचा आवाज बुलंद करण्यासाठी पार्लमेंट मध्ये पाठविणे गरजेचे असल्याचे मत कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम बी पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील हे प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काल सोलापुरात आले होते त्यावेळी त्यांनी बालाजी सरोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी केदार उंबररजे,बाळासाहेब शेळके,विश्वनाथ चाकोते, महादेव बहिर्गोंडे- सावकार. नगठानचे आमदार विठ्ठल कटकदौंड,महादेव पाटील. माजी सभापती.शंकर कांबळी आधीच उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की, सध्या मोदीचाच मुखवटा गळून पडला आहे. मोदी यांच्या हातून सत्ता निसटत असल्यामुळे सध्या ते सैरभैर झाले आहेत . भाजप कमजोर झालेली असतानाही ते ४०० चा आकडा पार करू असा नारा देत आहेत .वास्तविक पाहता ते २०० चा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत. ४०० शे पार हा आकडा कोणत्या राज्याच्या भरोशावर ते बोलत आहेत? कर्नाटक मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रा ,आधी राज्यांमध्ये भाजप पिछाडीवर आहे. असे असताना ते खोटं पण रेटून बोलत आहेत.
मोदींनी पेट्रोल डिझेल गॅस अशा अत्यावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांच्याच काळामध्ये जेवण आवश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत त्यांना दर नियंत्रित ठेवता आले नाहीत ते देश नियंत्रणात कसे ठेवतील असा सवाल ही पाटील यांनी केला आहे. दरवर्षी दोन कोटी नोकरी देऊ अशी आश्वासन देत १५ लाखाचे आमिष ही त्यांनी दाखविले होते. देशातील नुकसानित असणाऱ्या २३ कंपन्यांनी करोडो रुपयाचे इलेक्ट्रॉन बॉण्ड खरेदी केले आहेत. त्यानंतर मोदींचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे .लोकांनी आता त्यांना पूर्ण ओळखले आहे त्यामुळे भाजप देशात पिछाडीवर जाईल. आणि पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.