शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी भाजपला बहुमताने निवडून द्या पाशा पटेल यांचे आवाहन; सातपुतेंच्या प्रचारार्थ सभा

0
शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी भाजपला बहुमताने निवडून द्या
 पाशा पटेल यांचे आवाहन; सातपुतेंच्या प्रचारार्थ सभा

 द. सोलापूर 

 शेतकर्‍याला आपला माल आडात बाजार शिवाय इतरत्र विकता यावा ही सोय मोदी सरकारने उपलब्ध करून दिली. त्यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढली अन् शेतकर्‍याच्या मालाला भाव मिळू लागला. गावागावात शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. आगामी काळात सोयाबीन व कापूस उत्पादकांनाही चांगला पैसा मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी मोदी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शेती, शेतकरी व शेतमजुरांसाठी काम कारणार्‍या भाजपाला भरभरून मतदान करावे असे आवाहन कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी केले.
   दक्षिण सोलापूर मतदार संघातील आहेरवाडीत त आ. राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पटेल बोलत होते. यावेळी आ. सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लागू केला कृषि कायदा रद्द करायला लावून विरोधकांनी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केल आहे, असेही पटेल म्हणाले.
 यावेळी आमदार  देशमुख म्हणाले, 2014 पासून या मतदारसंघाचा कायापालट सुरू झाला असून मतदारसंघातील प्रत्येक गावाला भरघोस निधी मिळाला, रस्ते सुधारल्याने शेतकर्‍याचा माल बाजारपेठेत लवकर पोहचू लागला. विद्यार्थी शहरातील शाळा जवळ झाल्या, रुग्णाला अद्ययावत रुग्णालय या रस्त्यामुळे जवळ झाले. त्या बरोबरच दळणवळणाची सोय झाल्यामुळे शेतीपुरक दूध व्यवसायाला चालना मिळाली आहे.   ही लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्यावर भाजपा लढवत आहे. देशाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले. यावेळी विधानसभा प्रमुख हणमंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, रामप्पा चिवडशेट्टी,शशिकांत पाटील,पंडीत पाटील,अतुल गायकवाड,अप्पासाहेब मोटे,जगन्नाथ गायकवाड, यतीन शहा उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !