स्वेरीत बारा दिवसांची कार्यशाळा संपन्नइ अँड टीसी विभागातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

0
स्वेरीत बारा दिवसांची कार्यशाळा संपन्न
इ अँड टीसी विभागातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

पंढरपूर-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये दि.०७ एप्रिल ते दि. १९ एप्रिल २०२४ या दरम्यान बारा दिवसांच्या अर्थात दोन आठवड्यांची  कार्यशाळा संपन्न झाली. 
        स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘रिसेंट ऍडव्हान्समेंट इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड कंट्रोल’ या विषयावर आयोजिलेल्या या कार्यशाळेमध्ये मंगरूळ येथील संस्थापक व  संचालक हिमांशू कुमार हे प्रमुख मार्गदर्शन करत होते. उदघाटन प्रसंगी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.ए.ए.मोटे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार तसेच डॉ.एन. पी. कुलकर्णी, प्रा.एस. वाय. अभंगराव, प्रा.एस. एस. जाधव, प्रा.एस. डी. इंदलकर, प्रा.एस. आनंद आदी प्राध्यापक उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे जवळपास १४५  विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. संस्थापक संचालक हिमांशू कुमार म्हणाले की, 'ऑटोमेशन हे एक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे कोणतीही मशीन कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय कार्य पूर्ण करू शकते. तंत्रज्ञानाच्या या युगात, पायाभूत सुविधा, वाहतूक, उपयुक्तता, संरक्षण आणि सेवा क्षेत्र अशा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये ऑटोमेशनचा वापर वाढत आहे. औद्योगिक ऑटोमेशन प्रशिक्षणानंतर नोकरी आणि रोजगारासाठी आणखी चांगले पर्याय कोणते असू शकतात? हे सांगताना त्यांनी पात्र विद्यार्थ्यांकडे विशिष्ट करिअर मार्ग निवडण्यासाठी विविध  पर्याय असून बऱ्याच संधी आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑटोमेशनचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’ असे सांगून त्यांनी या कार्यशाळेत महत्वपूर्ण आणि विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यामध्ये पीएलसी म्हणजे काय ? त्याचे विविध प्रकार, यासाठी आवश्यक असणारे आघाडीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, तर्कशास्त्र विकास, यासंबंधी महत्वाच्या सूचना, औद्योगिक क्षेत्रात याचा कुठे आणि कसा उपयोग केला जातो? औद्योगिक आय/पीएस, ओ/पीएस, पीएलसी वायरिंग, औद्योगिक प्रकल्प विकास तसेच एचएमआय/ एमएमआय परिचय, पीएलसी सह इंटरफेसिंग, स्क्रीन डेव्हलपमेंट, डिजिटल; अॅनालॉग डेटा कॉन्फिगरेशन, अॅनालॉग डेटा स्केलिंग, पासवर्ड लेव्हल, स्क्रीन डिस्प्लेचा औद्योगिक प्रकल्प तसेच विकास एससीएडीएचा परिचय, पीएलसी सह इंटरफेसिंग, स्क्रीन डेव्हलपमेंट, डिजिटल: अॅनालॉग डेटा कॉन्फिगरेशन, अॅनालॉग डेटा स्केलिंग, ड्रायव्हर निवड आणि कॉन्फिगरेशन, टॅग तयार करणे आणि कॉन्फिगरेशनच्या माध्यमातून औद्योगिक प्रकल्प विकास कसा करावा? याची माहिती दिली. एसी ड्राइव्हचा परिचय, हार्डवेअर, पॅरामीटर सेटिंग, वेग, दिशा, प्रवेग आणि इंडक्शन मोटरचे डिलेरेशन टाइम कंट्रोल, पीएलसीसह इंटरफेसिंग, मल्टीस्पीड आणि बहुदिशात्मक नियंत्रण प्रकल्प. अॅनालॉग, अॅनालॉग सिग्नलचा परिचय, सिग्नल प्रकार, ब्लॉक आकृती, एटीडी आणि डीटीए रूपांतरण कार्यक्रम आणि वायरिंग, एसीएडीए सह इंटरफेस. इंटरफेसिंग प्रोजेक्ट बद्धल, पीएलसी, एचएमआय, स्काडा, एसी ड्राइव्ह, एसी यांचा संपूर्ण इंटरफेस वास्तविक औद्योगिक अनुप्रयोगासह मोटर, डिजिटल याविषयी माहिती दिली. यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. समारोप प्रसंगी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम. एस. मठपती सह विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुमंत आनंद यांनी केले तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !