पैठणीच्या खेळातून जागतिक महिला दिनी करकंबमध्ये माता-माऊलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि समाधान
करकंब येथे मोठ्या जल्लोषात महिलांनी लुटला आनंद
पंढरपूर / प्रतिनिधी :
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या वतीने माता-भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा, मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन क्षण स्वतःसाठी जगता यावे, या हेतूने सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला स्थानिक माता-भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला..
यंदाचा महिला दिन व महाशिवरात्री निमित्त अत्यंत कार्यक्रम आनंदात साजरा करता आल्याबद्दल माता-भगिनींनी श्री अभिजीत पाटील यांचे कौतुक करत भरभरून आशीर्वाद दिले..
"या सर्व माता-भगिनींच्या कुटुंबातील एक सदस्य, भाऊ आणि एक मुलगा म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणे माझी जबाबदारी आहे. येत्या काळात त्यांच्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा या आशीर्वादातून प्राप्त होईल" असे सांगितले.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण माजी सभापती रजनीताई देशमुख, सौ.रश्मी अमर पाटील, डॉ.मृदुला तळेकर, दुधाने मॅडम, समृद्धी अभिजीत पाटील, प्रदीप पाटील, बाळूआण्णा गुळमे, घनश्याम शिंगटे, सुभाष गुळवे, सतीश देशमुख, रमेश खारे, अर्जुन शेटे, लक्ष्मण नलवडे, सचिन शिंदे, यासह अनेक ग्रामस्थसह महिला भगिंनी, नागरिक उपस्थित होते.