अकलूज नगर परिषद आयोजित वसुंधरा चषक क्रिकेट स्पर्धेत पंढरपूर नगरपरिषद संघाचा अंतिम सामन्यात दणदणीत विजय.
पंढरपूर / प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा 3.0 अभियान अंतर्गत अकलूज नगर परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे दिनांक २३/४/२०२३ ते २४/४/०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते याकरिता सोलापूर जिल्ह्यातून नगरपरिषद, नगरपंचायत च्या बारा संघाने भाग घेतला होता यामध्ये पंढरपूर नगरपरिषद संघाने प्रथम फेरीमध्ये महाळूंग- श्रीपुर संघावर व क्वार्टर फायनलमध्ये मंगळवेढा संघावर व सेमी फायनल मध्ये बार्शी संघावर विजय मिळवला होता व अंतिम झालेल्या सामन्यामध्ये पंढरपूर विरुद्ध कुर्डुवाडी असा सामना झाला या मध्ये पंढरपूर संघाने प्रथम फलंदाजी करत सात षटकात एक बाद १४९ धावांचा डोंगर रचला यामध्ये नितीन मेहडा यांनी १०८ धावा काढल्या व शतक लगावले. १४९ धावांचा पाठलाग करताना कुर्डुवाडी संघाला सहा बाद 44 धावा पर्यंत मजल मारता आली
पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषद क्रिकेट संघ. संघप्रमुख व कोच आरोग्याधिकारी नागनाथ तोडकर, कर्णधार महेश गोयल नितीन मेहडा, रवी दोडिया, नितीन मेहडा (ज्युनियर) किरण सोलंकी, रजनीश गोयल, रोहित वाघेला पियुष गोयल, सुहास कदम, सुरेश सोलंकी, विकी दोडिया, जितेश वाघेला, श्याम अंबुरे, आनंद पाटोळे, शैलेश परमार,संघाकरीता
आरोग्याधिकरी शरद वाघमारे, धनंजय वाघमारे, संतोष सर्वगोड, गुरु दोडिया ॠषी अधटराव, बाबुशा माळी यांचे सहकार्य लाभले यावेळी नगरपरिषदेच्या वतीने उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे हस्ते टीम प्रमुख नागनाथ तोडकर व कर्णधार महेश गोयल, नितीन मेहडा व सर्व संघाचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यालय अधीक्षिका सुवर्णा डमरे, जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम, अंतर्गत लेखापरीक्षक रवींद्र वाघमारे अनिल अभंगराव, संभाजी देवकर, किरण मंजुळ, कृष्णात जगताप,चेतन चव्हाण,संतोष ऐतवाडकर हे उपस्थित होते