प्राथमिक शाळांच्या भौतिक सोयी - सुविधांसाठी १ कोटी निधी मंजूर - आ.समाधान आवताडे

0
प्राथमिक शाळांच्या भौतिक सोयी - सुविधांसाठी १ कोटी निधी मंजूर - आ.समाधान आवताडे

(प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्राथमिक शाळांच्या नवीन वर्ग खोली बांधणे, शौचालय बांधणे व इमारतींची इतर विशेष दुरुस्ती करणे अशा कामांसाठी मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १ कोटी निधी मंजूर झाला आहे.
 सदर निधी अन्वये पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट असणाऱ्या शाळा व कामांचे स्वरूप - जि. प. प्राथ. शाळा तपकीरी शेटफळ येथे १ वर्ग खोली बांधणे १० लाख, जि.प. प्राथ. शाळा शिरढोण येथील दुरुस्ती कामी - १ लाख ५० रुपये, जि. प. प्राथ. वस्तीशाळा येडगे / मुसलमान वस्ती, कोर्टी येथील दुरुस्ती कामी - १ लाख ५० लाख, जि. प. प्राथ. वस्तीशाळा इनामदार वस्ती व सिद्धेश्वर वस्ती कासेगाव येथील शाळांसाठी दुरुस्ती कामी व शौचालय बांधणे - ३ लाख, जि. प. प्राथ. वस्तीशाळा वाडेकर वस्ती शिरगांव येथील दुरुस्ती कामी - २ लाख, जि. प. प्राथ. शाळा खर्डी येथील दुरुस्ती कामी - २ लाख, जि. प. प्राथ. शाळा गादेगांव येथील दुरुस्ती कामी - २ लाख, जि. प. प्राथ. वस्तीशाळा ताड वस्ती एकलासपूर येथे शौचालय बांधणे -  १ लाख ५० हजार.

 सदर निधी अन्वये मंगळवेढा तालुक्यातील समाविष्ट असणाऱ्या शाळा व कामांचे स्वरूप - जि. प. मुलींची शाळा मरवडे येथील २ वर्ग खोल्या बांधणे - १८ लाख, जि. प. प्राथ. शाळा रहाटेवाडी येथील १ वर्ग खोली बांधणे - १० लाख, जि. प. प्राथ. शाळा सिद्धापूर येथील १ वर्ग खोली बांधणे - १० लाख, जि. प. प्राथ. शाळा अकोला येथील १ वर्ग खोली बांधणे १० लाख, जि. प. प्राथ. शाळा शिवाजीनगर मंगळवेढा येथील १ वर्ग खोली बांधणे १० लाख, जि. प. प्राथ. शाळा महमदाबाद (शे) येथील दुरुस्ती कामी २ लाख, जि. प. प्राथ. वस्तीशाळा दुधाळ वस्ती खवे येथील दुरुस्ती कामी २ लाख, जि. प. प्राथ. शाळा लमाणतांडा येथील दुरुस्ती कामी २ लाख, जि. प. प्राथ. शाळा बिराजदार वस्ती सोड्डी येथील दुरुस्ती कामी २ लाख, जि. प. प्राथ. शाळा येळगी येथील दुरुस्ती कामी २ लाख, जि. प. प्राथ. शाळा आसबेवाडी येथील दुरुस्ती कामी ३ लाख, जि. प. प्राथ. शाळा विठ्ठल नगर चोखामेळानगर येथील दुरुस्ती कामी २ लाख, जि. प. प्राथ. शाळा खोमनाळ येथील दुरुस्ती कामी २ लाख, जि. प. प्राथ. शाळा हिवरगांव येथील शौचालय बांधणेसाठी १ लाख ५० हजार, जि. प. प्राथ. शाळा हाजापूर येथील शौचालय बांधणेसाठी १ लाख ५० हजार, जि. प. प्राथ. वस्तीशाळा कागष्ट येथील शौचालय बांधणेसाठी १ लाख ५० हजार.

 क्रांतीकारक विचारांच्या आणि समाजपरिवर्तनशील संस्काराच्या जीवनप्रवासातील महत्वपूर्ण व प्राथमिक टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे अधोरेखित केली जाते. ग्रामीण भागातील विविध शाळांना स्वच्छता व मजबूत इमारती आणि इतर भौतिक सुविधा सक्षमपणे प्राप्त होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला हा निधी ग्रामीण भागातील वरील शाळांचे रूप सुजलाम - सुफलाम करण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे.  हनुमंत येडगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येडगे मुसलमान वस्ती कोर्टी
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !