आमदारांचा राजीनामा मागणारे शिंदे अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का? :- तुकाराम कुरे
सध्या केंद्रात व राज्यात तुमची सत्ता असताना अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर आमदार साहेबांनी राजीनामा द्यावा असे राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे त्यांनी दिलेल्या पत्रात एकीकडे त्या मस्तवाल अधिकाऱ्याची मस्ती जिरवा असेही श्रीकांत शिंदे म्हणत आहेत आणि दुसरीकडे आमदार साहेबांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी करत आहेत. त्यामुळे अशी राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा सत्तेत असणाऱ्या आमदार महोदयांनी स्वतःच्या सरकारमधील अधिकाऱ्याने चूक केली. तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र देऊन ते चुकीच्या कोणत्याही गोष्टीला पाठीशी घालत नाहीत हे प्रशासनाला व जनतेला दाखवून दिले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी आमदार महोदयांना राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन व स्वागत करून त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते, पण केवळ राजकीय हेतूने त्यांचा राजीनामा मागणे गैर आहे असे मत तुकारामआबा कुरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या प्रसिद्धी पत्रकावर व्यक्त केले आहे..
यावेळी बोलताना कुरे म्हणाले की, मतदार संघात कोट्यावधी रुपयाचा निधी आणून अनेक वर्ष प्रलंबित पडलेल्या प्रश्नांना आ समाधान आवताडे यांनी वाचा फोडली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात येत असताना शिंदे यांनी केवळ राजकारणासाठी व प्रसिद्धीसाठी असे वक्तव्य करण्यापेक्षा चांगल्या कामाचे अभिनंदन करत त्यांचा पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची धमक आमदार आवताडे यांच्यामध्ये असून ते चुकीच्या गोष्टीला कधीही पाठीशी घालत नाहीत हे अनेक वेळा मतदारसंघातील जनतेने अनुभवले आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून असे वक्तव्य करण्यापेक्षा आमदार आवताडे यांचे काम पाहून वक्तव्य केले असते तर ते जनतेलाही पटले असते. त्यातच पंढरपूर मध्ये आवताडे गट हा सक्षम झाल्याने त्यांना खाली कसे खेचता येईल याचा प्रयत्न तर अधिकार्यांना हाताशी धरून चालू नाही ना आणि त्यातच मतदार संघासाठी ना भूतो ना भविष्यातो इतका निधी आमदार आवताडे यांनी अनलेला असल्याने जनतेची मने जिंकलेली आहेत. चुकलेल्या अधिकाऱ्यावर कश्या स्वरुपात कार्यवाही करायची व गेलेला निधी कसा मिळवायचा याची माहिती आमदार आवताडे यांना असून यात जनतेच्या व आमच्या मानत तिळमात्रही शंका नाही. तरी आपण याची जास्त चिंता करण्याची गरज नाही आपण आपले सरकार असताना या मतदार संघाला किती निधी उपलब्ध करुन दिला याची माहिती घ्यावी आणि मग लोकप्रतिनिधी चा राजीनामा मागवा..
आ समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील बांधकाम विभाग व नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अडीच कोटी निधी मिळाला नाही. यमाई तलाव व अनवली येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी हा निधी मिळणार होता. मात्र अधिकाऱ्यांनी वेळेत अंदाजपत्रक न दिल्याने तो निधी मिळू शकला नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या संदर्भात श्रीकांत शिंदे यांनी मत व्यक्त करताना पंढरपूर येथील अधिकारी हे कोणाच्या सांगण्यावरून प्रस्ताव सादर करण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर कोणत्या नेत्याचा दबाव आहे याची चौकशी करून आमदार आवताडे यांच्यासोबत त्या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी प्रयत्न केला तर जनता त्यांचं स्वागत करेल केवळ लोकांचं लक्ष वेधण्यासाठी प्रसिद्धी पत्रक काढण्यापेक्षा खरंच जाणून-बुजून कामाला अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी अशी प्रसिद्धी पत्रके काढली तर मतदार संघाच्या विकासाला हातभार लागेल असेही तुकाराम कुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले..