पुण्यातील फार्माकोग्नोसीच्या अधिवेशनात स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
फार्मसीच्या मैथिली शहा यांचे पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश
पंढरपूर- ओतूर (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील श्री.गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात दि.२ आणि दि.३ एप्रिल रोजी इंडियन सोसायटी ऑफ फार्माकोग्नोसीचे २६ वे अधिवेशन आणि जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. या अधिवेशनाचा व जागतिक परिषदेचा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होणार असून औषधनिर्माण क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांना मदत मिळणार आहे.
देशभरातून प्रतिसाद मिळालेल्या या दोन दिवसीय अधिवेशनात स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन नवीन ज्ञान आत्मसात केले. इंडियन सोसायटी ऑफ फार्माकोग्नोसी च्या या २६व्या परिषदेसाठी प्राचार्य, प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना व संशोधकांना भविष्यात संशोधन करताना या परिषदेच्या माध्यमातून नवीन संकल्पनांची जोड देता येणार आहे. एक्स्पर्ट पॅनेल कमिटी ऑफ एफडीसीच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ.चंद्रकांत कोकाटे म्हणाले की, ‘संपूर्ण देशभरामध्ये हिमालय पर्वतानंतर सह्याद्री घाटामध्ये औषधी वनस्पतींची उपलब्धता अधिक प्रमाणात आहे. यासाठी फील्ड व्हिजीट करण्यासाठी भीमाशंकर अभयारण्य हा पॉईंट आयोजकांनी निवडला आहे.’ या अधिवेशनात घेतलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तृतीय वर्षात शिकत असलेल्या मैथिली प्रीतम शहा या विद्यार्थिनीने पारितोषिक मिळविले त्याबद्दल त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या अधिवेशनात स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मणियार, डिप्लोमा फार्मसीचे विभागप्रमुख प्रा.जे.बी.कंदले, शैक्षणिक प्रभारी एल.एन.पाटील, प्रा.ए.आर.चिक्काले, प्रा.एस.व्ही. शिंपले, इतर प्राध्यापक वर्ग यांच्यासह २५ विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी पेपर प्रेझेंटेशनही केले.