सहाय्यक वेतन अनुदान 27 तारखेपर्यंत न मिळाल्यास 28 एप्रिल रोजी नगरपालिके समोर नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
पंढरपूर /प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सहाय्यक वेतन अनुदान ची रक्कम दिनांक २७ एप्रिल पर्यंत न मिळाल्यास दिनांक २८ एप्रिल ०२३ रोजी महाराष्ट्रातल्या सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी नगरपालिका समोर निदर्शने करून धरणे आंदोलन करणार.
महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांचे वेतन वेळेवर व्हावे म्हणुन शासनाकडुन सहायक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत नगरपरिषदांना मिळावी म्हणून यापूर्वी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्याचे अध्यक्ष डॉ डी एल कराड, संतोष पवार अँड सुनील वाळूजकर,सुरेश ठाकूर,डी.पी शिंदे, रामगोपाल मिश्रा यांनी दिनांक 20 मार्च 2023 रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समक्ष मंत्रालयात झालेल्या चर्चेच्या वेळी सहाय्यक वेतन अनुदानाचा प्रश्न मांडला होता व मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व संबंधित अधिकारी यांना महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने शिक्षकांसाठी राबविण्यात येणारी शालांत सेवार्थ प्रणाली राबवून सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या असे असून सुद्धा अद्याप पर्यंत शासनाने राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान आदा केलेले नाहीत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात १४ एप्रिल ०२३ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली परंतु महाराष्ट्रातील सफाई कर्मचा-यांचे व इतर कर्मचा-यांना वेळेवर वेतन न मिळाल्याने सफाई कर्मचा-यांना जयंती उत्साहात साजरी करता आली नाही तसेच रमजान सारखा पवित्र सण असुन सुद्धा मुस्लिम बांधव कर्मचाऱ्यांना सण साजरा करता आला नाही ही बाब अतिशय संतापजनक व खेद जनक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचा-यामध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष पसरला आहे तरी दिनांक २७ एप्रिल पर्यंत सहायक वेतन अनुदानाची रक्कम महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपालिकांना न मिळाल्यास दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी हे सकाळी ११ वाजता शासनाचे या मागणी कडे लक्ष वेधण्यासाठी नगरपालिकेसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे संघर्ष समितीचे मुख्य संघटक अँड सुनील वाळूजकर यांनी दिली