पटवर्धन कुरोली मध्ये 1 मे रोजी MSEB विरोधात हलगी नाद आंदोलन
पटवर्धन कुरोली /प्रतिनिधी
उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्या मुळे ग्रामीण भागात पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे .पटवर्धन कुरोली मध्ये ही ह्या समस्येने शेतकरी हैराण झालाय अक्षरशः आठवड्यातून तीन ते चार दिवस विजेची लाईन जवळपास 12 ते 18 तासांपर्यंत फॉल्ट असते अश्या शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत.आणी ह्या विजेच्या डीपी बंद राहण्यामुळे शेतकार्याची हजारो हेक्टर वरील उभी पिके जाळून जात आहेत.
आणि ह्याच कारणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटने सह पटवर्धन कुरोली ग्रामस्थांनी वेळो वेळी MSEB अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केली त्या पुढे जाऊन त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला मात्र MSEB चे अधिकारी असतील किंवा लाईन स्टाफ वायरमन असेल ते जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी केला आहे . आता परत एकदा त्यांनी संवेदनशील व गंभीर विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पटवर्धन कुरोली उपकेंद्र समोर हलगी नाद आंदोलन करण्यात येणार आहे.त्या नंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर 8 मे पासून पटवर्धन कुरोली उपकेंद्र समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.