15 दिवसात जलतरण तलाव सुरू न झाल्यास प्रशासनाचा 10 वा विधी त्याच तलावामध्ये करणार - श्रीकांत शिंदे
पंढरपूर नगरपरिषदेस दिला निवेदनाद्वारे इशारा
पंढरपूर प्रतिनिधी :
पंढरपूर शहरातील नागरिक यांच्याकडून नगरपरिषदेला जो कर भरला जातो त्याच कराच्या माध्यमातून नगरपरिषद जनतेला सुख सुविधा उपलब्ध करून देते मग अशाच कराच्या व शासनाकडून मिळालेल्या निधीतून बांधण्यात आलेला जलतरण तलाव हा गेली कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत आहे, त्यातील पाणी अत्यंत खराब झाले आहे त्या दूषित पाण्यामुळे परिसरातील मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. "तसेच त्या जलतरण तलावामध्ये असणाऱ्या विद्युत मोटर या लाखो रुपयांच्या मोटारी चोरीला गेलेल्या आहेत त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी श्री मानोरकर साहेब यांनी अज्ञातावर गुन्हा ही दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला हे सुद्धा जनतेला समजणे गरजेचे आहे. करोडो रुपये खर्च करून बंद असलेला जलतरण तलाव पुन्हा सुरू करून पंढरपूर मधील नागरिकांना लहान मुलांना तो सुसज्ज पद्धतीने बांधून पुन्हा 15 दिवसात जलतरण तलाव सुरू न झाल्यास प्रशासनाचा 10 वा विधी त्याच तलावामध्ये करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेला आहे. सदरचे निवेदन उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी स्विकारले.
यावेळी मा नगरसेवक मुहम्मद उस्ताद,शहराध्यक्ष स्वप्निल जगताप,तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण,जिल्हा सचिव सूरज पेंडल,जिल्हा संघटक,सारंग महामुनी, शहर कार्याध्यक्ष सूरज गंगेकर,शहर उपाध्याक्ष दादा थिटे,शुभम पवार,निलेश कोरके,मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष संतोष बंडगर आदि उपस्थित होते
श्रीकांत शिंदे म्हणाले की, पंढरपूर मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान ही नाहीत आणि पोहण्यासाठी जलतरण तलाव ही नाही नदी आहे पण त्यात वाळू चोरीमुळे खड्डे पडलेले आहेत. अन त्यात एखाद्या मुलाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण ? तरी लवकरात लवकर हा जलतरण तलाव सुरू करावा नाहीतर लोकशाही मार्गाने आम्ही नगरपरिषदेच्या विरोधात आम्ही आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Tags
पंढरपूर घडामोडी