सोलापूर ग्रामीण पोलीस दलात घडली खळबळ उडवणारी घटना
महिला पोलिस कर्मचाऱ्याने केली गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी,
अवघे पाच महिन्याचे मुल असलेल्या तरुण पोलीस कर्मचारी महिलेने गळफास घेवून आपल्या जीवनाचा शेवट केल्याचे सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. माढा तालुक्यातील आपल्या घरीच महिला पोलिसाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मोहोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आणि माढा येथील शिवाजी नगरमधील रहिवासी असलेल्या या विवाहित महिला पोलिसाने केलेल्या आत्महत्येने जेवढी हळहळ व्यक्त होत आहे तेवढीच खळबळ देखील उडाली आहे. पस्तीस वर्षे वयाच्या स्वाती दत्ताञय अंभुरे उर्फ स्वाती भगतसिंग घोगरे यांनी माढा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असल्याची बाब समोर आली परंतु त्यांनी हे टोकाचे पाऊल कशासाठी उचलले याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत महिला पोलीस कर्मचारी स्वाती दत्ताञय अंभुरे उर्फ स्वाती भगतसिंग घोगरे या माढा येथील शिवाजीनगर येथे राहत होत्या आणि मोहोळ पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांनी प्रसूतीसाठी सहा महिन्यांची रजा देखील घेतली होती आणि त्यांना पाच महिन्यांचे एक मुल देखील आहे. त्यामुळे या घटनेचे मोठे दु:ख व्यक्त होत आहे.
गळफास घेतल्यानंतर नातेवाईकानी लगेच त्यांना एका रुग्णालयात हलवले परंतु दुर्दैवाने उपचाराच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली.वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली. पाच महिने वयाचे बाळ असताना स्वाती यांनी उचललेले हे धक्कादायक पाऊल अनेकांना विचारात पाडणारे ठरले आहे. केवळ दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झालेला होता आणि त्यांना वेदांत हा पाच महिन्याचा मुलगा देखील होता.
पाच महिन्याचे मुल पदरी असताना आणि त्याला अद्याप आईची गरज असताना पोलीस सेवेत असलेल्या स्वातीने कशासाठी आत्महत्या केली याचा उलगडा झालेला नाही.
त्यांनी कुठल्या कारणासाठी हे पाऊल उचलले असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असून पोलीस तपासात काही निष्पन्न होईल परंतु या घटनेने अनेकांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे. सहकारी पोलीस आणि पोलीस दलाला देखील या घटनेने जोरदार धक्का दिला आहे.