पंढरपूर येथील राणा प्रताप ग्रुप च्या वतीने छत्रपती शिवरायांच्या 393 व्या जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व शिवगौरव पुरस्कार वितरण समारंभ नुकताच संपन्न आला.

पंढरपूर येथील राणा प्रताप ग्रुप च्या वतीने छत्रपती शिवरायांच्या 393 व्या जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व शिवगौरव पुरस्कार वितरण समारंभ नुकताच संपन्न आला.

प्रतिनिधी प्रकाश इंगोले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पु.अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ.विकास कदम सर हे होते .या पुरस्कारांचे वितरण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्या हस्ते करण्यात आले .सदर कार्यक्रमास एस.पी.स्कूल,नांदोरेचे संस्थापक डॉ.संतोष वलगे प्रमुख उपस्थित होते.
 यावेळी आदर्श माता सौ. पार्वती नामदेव जाधव ,आदर्श साहित्यिक सौ. स्मिताताई दिलीप कवडे, आदर्श क्रीडा शिक्षक दिलीप चव्हाण सर, आदर्श शिक्षक प्रा.नानासाहेब देवकते ,आदर्श समाजसेवक विष्णू शेटे ,आदर्श आरोग्य सेवक अजित खिलारे व आदर्श संस्था वृक्षप्रेमी ग्रुप, पंढरपूर यांना गौरविण्यात आले. यावेळी दिपक दिगंबर गडम यांची वैमानिक म्हणून निवड झाल्याबद्दल व कौस्तुभ पुरुषोत्तम कदम याची एन.एम.एम.एस परीक्षेत गुणांकन मिळाल्यामुळे विशेष सत्कार करण्यात आला. घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळेस करण्यात आले.स्वागत प्रशांत पाटील सर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये संस्थापक प्रतापसिंह चव्हाण यांनी संस्थेचे कार्य व उद्देश स्पष्ट केले. 
पाहुण्यांचा परिचय सचिन लादे यांनी करून दिला. आभार ज्ञानेश्वर मोरे सर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कदम यांनी केले. हा शिव विचार समाजात पेरण्यासाठी हवे ते सहकार्य करण्याचे आश्वासन सतीश मुळे यांनी दिले. विकास कदम यांनी शिवरायांचा जीवनपट सर्वांसमोर मांडला. डॉ संतोष वलगे यांनी राणा प्रताप ग्रुपचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमासाठी एसपी स्कूलचे सचिव अश्वराज वाघ मोहन अनपट सुखदेव चव्हाण गजेंद्र पवार  सर श्रीकांत बडवे व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी बाबासो शिंगण, महेश भोसले, ज्ञानेश्वर गवळी, कृष्णा शूरसेटवार, प्रदीप बोराटे, माऊली निकते, सचिन लोळगे, प्रवीण सुरवसे, सोमनाथ माने, घनश्याम धुमाळ, रविराज सोनार, दिनेश गावडे, रविकांत कदम, दिगंबर गडम ,आनंद शिंदे, प्रशांत पाटील, मंदार केसकर, अमर गायकवाड, प्रसाद कुलकर्णी, प्रशांत सादिकले, आनंद नगरकर,श्याम गोगाव शंकर कवडे व राणा प्रताप ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. आभार ज्ञानेश्वर मोरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post