मंगळवेढा पोलीसांचा अवैध्य वेश्या व्यवसायावर छापा :एका पिडीत मुलीसह आरोपीस ताब्यात घेतले

0
मंगळवेढा पोलीसांचा अवैध्य वेश्या व्यवसायावर छापा :एका पिडीत मुलीसह आरोपीस ताब्यात घेतले 

दिनांक 14/01/2023 रोजी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे लेंडवे चिंचाळे येथील मंगळवेढा ते सांगोला जाणारे रोडच्या उजव्या बाजुस असणारे हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज बोर्डिगमध्ये पैसे घेवुन अवैध्य मानवी व्यापार चालु आहे. अशी बातमी मिळाली होती.
त्या अनुशंगाने वरिष्टांच्या परवाणगीने कायदेशीर प्रक्रियापुर्ण करुन पोलीस ठाणेकडील अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार तसेच पंच व बनावट ग्राहक यांना पोलीस ठाणेस बोलावुन घेवुन वरील घटनेबाबत पुर्ण माहिती दिली. त्यावेळी उपस्थितीत असणारा बनावट ग्राहक यास पोलीसा जवळील 1200 रुपये पंचाचे समक्ष देण्यात आले. व त्याचे नंबर नोट करुन त्यास योग्यत्या सुचना देवुन रवाना केले.

त्यानंतर पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार व पंच असे सरकारी वाहनाने लेंडवे चिंचाळे येथील ब्रिजच्या पुलाच्या खाली आडोशाला जावुन थांबले. व थोड्याच वेळात बनावट ग्राहकाचा संकेत असल्याने सर्व महिला व पुरुष अधिकारी अंमलदार यांनी छापा टाकला असता एक पिडीत मुलगी, बनावट ग्राहक व लॉजचे मालक रंगेहात सापडले त्यावेळी त्याची झडती घेतली असता पोलीसांनी बनावट ग्राहकास दिलेले पैसे आरोपी अविनाथ विष्णु येडगे यांचे ताब्यात मिळुन आले असता पोलीसांनी आरोपी, पिडीत महिला, बनावट ग्राहक यांच्याकडे चौकशी केली असता हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज येथे स्वताच्या अर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलेची शरीरीक पिळवणुक करुन तिचे कडुन वेश्या व्यवसाय करुन घेवुन तिचे कमाईवर स्वताची उपजिवीका करताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द गु.र.नं. 36/2023 भादवि कलम 370, व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनीयम 1956 चे कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, मा. श्रीमती राजश्री पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि सत्यजित आवटे, पोसई सलिम शेख, पोसई अशोक बाबर, पोसई पुरुषोत्तम धापटे, सपोफौ अविनाश पाटील, पोहेकॉ हजरत पठाण, पोहेकॉ दत्ता येलपले, पोकॉ राजु आवटे, पोकॉ प्रविण सावंत, पोकॉ कदम, मपोना सुनिता चवरे, मपोकॉ अंजना आटपाडकर यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा ठाणे हे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !