पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन एकून २.१६,५००/- रू किंमतीचे ३५ मोबाईल हँडसेट जप्तीची उल्लेखनीय कामगिरी

0
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन एकून २.१६,५००/- रू किंमतीचे ३५ मोबाईल हँडसेट जप्तीची उल्लेखनीय कामगिरी

पंढरपुर येथे कार्तिक वारीमध्ये येणा-या परजिल्हयातील भाविकांचे मोबाईल चोरीस गेलेबाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुरनं ८६६ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयामध्ये ०७ मोबाईल हँडसेट चोरी केलेबाबतची तक्रार प्राप्त झालेने गुन्हे पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीकडुन २,१६,५००/- रू किमतीचे चोरी केलेले एकुण ३५ मोबाईल हे गुन्हयाचे तपासकामी जप्त करणेत आलेले आहेत.
वरील हस्तगत करणेत २,१६,५००/- रू किमंतीचे ३५ मोबाईल हँडसेट हे सोलापुर जिल्हयातील व कर्नाटक राज्यातील असुन ते एका आरोपींताकडुन वरनमुद चोरी गेलेला मुद्देमाल गुन्हे उघडकीस आणुन जप्त करणेत आलेला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री शिरीष सरदेशपांडे साो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, श्री. विक्रम कदम सो व श्री. अरूण फुगे सो, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि चिमणाजी केंद्रे पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ नागेश , कदम, राजेश गोसावी, पोहवा ४१९ शरद कदम, पोहवा ३९६ सुरज हेंबाडे, पोहवा १०६३ ढेरे, पोना १७३६ सचिन इंगळे, पोना ४८४ सुनिल बनसोडे, पोना १७८९ सचिन बाडे, पोना १६५७ दादा माने, पोना ५६२ राकेश लोहार, पोको १२१६ शहाजी मंडले व सायबर सेलचे पोका अन्दर आतार यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !