डोंगरगाव शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न
डॉ. प्रीती शिर्के यांनी केले महिलांना मार्गदर्शन
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले
डोंगरगाव-:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव तालुका मंगळवेढा या शाळेच्या वतीने शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी मकरसंक्राती निमित्त हळदी कुंकू चा कार्यक्रम तसेच डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिका खिलारे होत्या तर मंगळवेढ्याच्या नामांकित डॉ. सौ. प्रीती शिर्के ह्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून शाळेतील विविध समस्या मांडल्या.तर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका अमृता कुलकर्णी यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तालुका व जिल्हा स्तरावरती विविध क्षेत्रात केलेल्या विविध कला गुणांचे सादरीकरण केले. तसेच सांगोला येथील अजिंठा अकॅडमी तर्फे आयोजित केलेल्या कथाकथन, रंगभरण स्पर्धेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षिका राधिका शिलेदार यांचा ग्रामस्थाच्या वतीने गुण गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. प्रीती शिर्के यांनी महिलांच्या विविध आरोग्य विषयक समस्या व त्यावरील उपाय यावरती मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना सरपंच सारिका खिलारे म्हणाल्या की कोणत्याही गावाचा दर्जा हा त्या गावच्या शाळेवरून ठरतो याची मला जाणीव असून शाळे संदर्भातील सर्व भौतिक सुविधा पुरविण्याचे मी अभिवचन देते. या कार्यक्रमाला सरपंच सारिका खिलारे यांच्यासह उपसरपंच प्रदीप चौगुले, नूतन ग्रामपंचायत सदस्य अमिना पठाण, सुजाता खडतरे,बाबा सय्यद, सचिन शिंदे, शुभांगी लोहार, राणी मोरे, प्रियांका नागणे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे, माजी उपसरपंच गनीम पठाण, दत्ता लोहार,दादा खिलारे, भगवान गवळी ,अंगणवाडी सेविका मनिषा मस्के, मदतनीस रोहिणी गवळी,वैशाली चंदनशिवे,मदिना सय्यद ,मधुकर मोरे आदी सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका अमृता कुलकर्णी, राधिका शिलेदार, कविता वाघमारे, अंबिका कर्वे, प्रियांका घाटेराव, आण्णासो मोहिते व अनिल पाटील या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत कविता वाघमारे मॅडम यांनी केले तर मुख्याध्यापक पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.