समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार
पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवणारे समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे मोठे कार्य असून नेहमीच अडचणीतील व्यक्तींना मदतीचा हात देऊन मदत करताना दिसून येतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे पाटील यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनाही सन्मानित करण्यात आले.
यामुळे समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील शिरगाव येथील शिवतीर्थावर हा सोहळा साजरा झाला. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, खर्डी चे उपसरपंच प्रणव परिचारक, पांडुरंग कारखान्याचे संचालक वसंत नाना देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी गोरगरिबापासून अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना वेळोवेळी मदतीचा हात त्याचबरोबर इतर काही कामे असतील तर तेही त्यांनी करून दिली असल्याची अनेक उदाहरणे आहेत कोरोना काळात कोरोना योद्धा या पुरस्काराने त्यांना विविध संघटने कडून पुरस्कार मिळालेले आहेत आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या समाजसेवकाची ग्रामीण भागातील अखिल भारतीय छावा संघटनेने ही दखल घेतली व पंढरपूर तालुक्यातील शिरगाव येथील शिवतीर्थावर त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले मात्र ग्रामीण भागातून मिळालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमात जो सन्मान झाला त्या सन्मानासाठी मी समाजासह छावा संघटनेचा ऋणी असून अ.भा. छावा संघटनेने हा पुरस्कार देऊन जो गौरव केला आहे त्यामुळे सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळालेले आहे. माझे सामाजिक कार्य अखंडपणे सुरू राहणार असून मी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले आहे माझ्या परीने गोरगरीब आडलेल्यांना मदतीचा हातही देण्यास मी तत्पर असतो अशा पुरस्कारामुळे मला प्रोत्साहन मिळते.
(समाजसेवक संजय बाबा ननवरे)