दोन जुळ्या बहिणींशी लग्न करण पडलं भारी : पोलिसांना चौकशी चे आदेश
मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली. त्यानंतर या विवाह करणाऱ्या वधूवराला आता हे लग्न चांगलंच माहागात पडणार आहे. कारण राज्य महिला आयोगाने या लग्नाची चौकशी करून आलेला अहवाल आम्हाला सादर करण्याचे आदेश सोलापूर पोलिसांना दिलेले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यावर ट्विट केले. ट्विटर द्वारे त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. आम्ही या सर्व लग्नाचे चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकाच मंडपात दोन जुळ्या बहिणीचे लग्न करणे नवरदेवाच्या अंगलट आले आहे.
हा नवरदेव माळशिरस तालुक्यातील असून याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. कांदिवली येथील आयटी इंजिनियरिंग करून गलेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून लहानपणापासून त्या एकत्रच वाढल्या आहेत. त्यांना बालपणापासून मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मुळचा माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या अतुल या तरुणाचा या कुटुंबाशी संबंध आला. या मुलींच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या. एकदा या कुटुंबातील आई व दोन मुली आजारी पडल्यावर अतुल याच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात असत. याचवेळी अतुल आणि या दोन तरुणींचा संपर्क वाढत गेला. अखेर अतुल याने पिंकी आणि रिंकी या दोन्ही तरुणींशी एकाच मांडवात विवाह केला. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास ३०० पाहुणे मंडळी लग्नासाठी गलांडे हॉटेलमध्ये उपस्थित होते.