भाळवणी येथे उद्या तेज न्यूजच्या वर्धापनदिनाचे आयोजन
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्यूज चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्या दिनांक 28 12 2022 रोजी संध्याकाळी पाच तीस वाजता शाकंभरी देवी मंदिर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संपादक प्रशांत माळवदे यांनी दिली.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आहेत तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर यावेळी भाळवणी येथील ज्येष्ठ मार्गदर्शक इस्माईल इनामदार गुरुजी, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक कल्याण रावजी काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब देशमुख, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य संभाजी राजे शिंदे, भाळवणी गावचे सरपंच राजकुमार पाटील, केसकरवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक संजय राजे मासाळ तसेच पळशी येथील पोलीस पाटील प्राध्यापक अशोक भोसले या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपणास विनंती करण्यात येते, की या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे असे आव्हान माळवदे यांनी केले आहे.