पत्रकारांची मोफत तपासणी व सवलतीच्या दरात औषधोपचार व्हावा - सुजित सातपुते

0
पत्रकारांची मोफत तपासणी व सवलतीच्या दरात औषधोपचार व्हावा - सुजित सातपुते 

पिलीव/प्रतिनिधी 

पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार सुरक्षा समिती माळशिरस  तालुकाध्यक्ष सुजित दिगंबर सातपुते यांनी पत्रकारांच्या तपासण्या व औषधोपचारासंदर्भा विषयी निमा संघटनेला निवेदन दिले आहे.
 निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील विविध ठिकाणच्या बातम्या संकलन करण्यासाठी पत्रकारांना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून वेळ काळ न बघता बातमी कव्हर करण्यासाठी धावपळ करावी लागते.सततच्या धावपळीमुळे प्रत्येक पत्रकाराचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते व आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विविध आजारांना पत्रकार बळी पडतात त्यातच अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असते.अशा मध्येच मोठमोठ्या आजाराला जर सामोरे जावे लागले तर घराचा प्रमुख असलेल्या पत्रकारांसमोर आरोग्याचा विषय हे एक गंभीर स्वरूपाचे आव्हान उभे राहते.त्यामुळे आपण माळशिरस तालुक्यातील विविध वर्तमान पत्राचे,साप्ताहिकाचे युट्युब चॅनेलचे व न्युज पोर्टलचे जे काही पत्रकार बांधव असतील त्यांना आपल्या नॅशनल इंटी ग्रेटेड मेडिकल (निमा) संघटनेतील हॉस्पिटलच्या ठिकाणी मोफत
 तपासणी,सवलतीच्या दरात औषध उपचार व शस्त्रक्रिया करावी.सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने सदर निवेदनाची दखल घेऊन तालुक्यातील पत्रकार बांधवांना सहकार्य करावे अशा अशयाचे सुजित सातपुते यांनी नॅशनल इंटी ग्रेटेड मेडिकल असोशीएशनचे (निमा संघटना) माळशिरस तालुकाध्यक्ष डॉ.शिरीष रणवरे यांना निवेदन दिले आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,शुभजीत नष्टे,प्रफुल्ल वाघमारे आदि उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !