अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरना करणाऱ्यांवर कारवाई

0
अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरना करणाऱ्यांवर कारवाई 

पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते, सदर गर्दामध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब लक्षात घेऊन आज दिनांक २२/१२/२०२२ रोजी मा. तहसिलदार पंढरपूर श्री. सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरना होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. पुरवठा निरिक्षक श्री सदानंद नाईक यांनी नियमित तपासणी अंतर्गत पंढरपूर येथील कळशेनगर वडर गल्ली जुना अकलूज रोड लगत असलेल्या गाळ्यात अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधुन रिक्षामध्ये भरत असल्याची माहीती मिळाल्याने तहसिल कार्यालयातील कोतवाल श्री. प्रल्हाद खरे व श्री. महादेव खिलीरे सदर ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी सुभाष शिवाजी जाधव वय - ६४ वर्षे रा. पंढरपूर या इसमास घरगुती वापरातील एकुण ०४ सिलेंडर व टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे दोन इलेक्ट्रीक मोटार व वजनकाटा (अंदाजे रक्कम २३०००/- रू) या मुद्देमालासह रंगेहात पकण्यात आले.
तसेच अंबाबाई पटांगण अंबाबाई देवीच्या समोरच्या बाजुला एक पत्र्याची टपरीमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून गॅस रिक्षामध्ये भरत असुन तेथे अवैधरीत्या गॅस विक्री करत असल्याची माहीती मिळाल्याने तातडीने वरील पंच व पो.हे.कॉ. श्री. गणेश शिंदे यांचे सह सदर ठिकाणी पोहोचलो असता, एक आज्ञात इसम वर नमुद वर्णनाप्रमाणे २ घरगुती गॅस सिलेंडर टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार असे एकूण ८०००/- रू. चे साहित्य मिळण आले ती वेळ दुपारी १.३० वा. ची असून दोन्ही ठिकाणचे सविस्तर वेगवेगळे पंचनामे तयार केले आहेत. वरील कार्यवाहीच्या अनुषंगाने १) सुभाष शिवाजी जाधव वय ६४ वर्षे २) अज्ञात व्यक्ती विरूदध जिवनांवश्यक वस्तु कायदा १९५५ च्या कलम ३ व कलम ७ अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !