पंढरपूरात भाजपच नंबर वनः भास्कर कसगावडे
अकरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच नंबर वन ठरला आहे. मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप विचाराचे ५ सरपंच आणि ४८ सदस्य निवडून आले आहेत, असा दावा भाजपचे पंढरपूर तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनी केला.
तालुक्यातील ११ पैकी भाजप विचारांच्या आणि परिचारक समर्थक ५ ग्रामपंचायतीचे सरपंच निवडून आले. व्होळे येथे सुवर्णा भुसनर, बार्डी येथे उमेश खंदारे, पुळूजवाडी येथे रेश्मा होनकळस, टाकळी गुरसाळे येथे गिरीजा कुशकुमार वाकसे आणि सुगाव खेडभोसे येथे महावीर हनुमंत गायकवाड हे सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील निवडून आलेल्या १०६ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ४८ सदस्य हे भाजपचे आहेत. हे सर्व नूतन सरपंच आणि सदस्य माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना भेटल्याचे भास्कर कसगावडे यांनी सांगितले.