सोलापूर - पंढरपूर-कुर्डुवाडी रोडवर फॉर्च्यूनर गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात गाडी पुलावरुन ५० फूट खाली कॅनॉलमध्ये कोसळली. कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येताना गाडी चालकाला आष्टी रोपळे येथे अंदाज न आल्याने अपघात झाला. यावेळी, दोन महिला गंभीर जखमी झाल्या असल्याचे समजते.
एसआयआयएल कंपनीने रस्त्याचे काम केले आहे. मात्र, पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. पुलाच्या दोन्ही बाजूला अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघात घडू शकतात, याचा साधा सूचना फलकही लावलेला नाही. अनेकदा नागरिकांना पुलाचे काम अर्धवट राहिल्याचा अंदाज येत नाही.
संबंधित रस्ते विकासक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुलावरुन कार थेट ५० फूट खाली कोसळल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूला अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघात घडू शकतात, याचा साधा सूचना फलकही लावलेला नाही. अनेकदा नागरिकांना पुलाचे काम अर्धवट राहिल्याचा अंदाज येत नाही.