गेल्यावेळी जामीनावरील सुनावणी नंतर बाहेर पडताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर, सर्व काही ओक्के आहे, आपण लवकरच बाहेर येणार, असे संजय राऊत म्हणाल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.
त्यावरुन "बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही," अशा शब्दात न्यायाधीशांनी पोलिसांचे कान उपटले होते. कोर्टाच्या बाहेरची गर्दी मी नियंत्रणात आणू शकत नाही. बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. जर कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी आहे' असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना खडेबोल सुनावले होते.
त्यानंतर आज विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी माध्यमांशी किंवा कार्यकर्त्यांकडे काही प्रतिक्रिया देऊ नये म्हणून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. राऊतांनी माध्यामांना जाऊ नये म्हणून त्यांच्या आवतीभोवती पोलिसांचा गराडा ठेवण्यात आला होता.
गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत राऊतांचे वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला होता. अलिबागच्या प्लॉट खरेदी प्रकरणात प्लॉटधारकांच्या जबाबात तफावत आहे. प्रविण राऊतांसोबत झालेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांबाबत आम्ही कोणतीही माहिती लपवून ठेवली नसल्याचे मुंदरगी यांनी सांगितले. पण तपास यंत्रणांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही कोणत्याही प्रकराचे मनी लॉण्ड्रिग किंवा कोणताही गुन्हा केलेला नसल्याचेही मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.