एस.टी कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी माऊली हळणवर यांची निवड...
पंढरपूर - सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
यानिमित्ताने पंढरपूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भटक्या विमुक्त मोर्चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष नितिन काळे,रासप विद्यार्थी आघाडीचे पंकज देवकते, तालुका अध्यक्ष संजय लवटे,जेष्ठ नेते जे.के गायकवाड,वंचितचे लिंगराज सरवदे, गणेश चव्हाण,दादा कोळेकर,प्रविण पिसाळ,मारुती वाघमोडे आदी उपस्थित होते.
मागील काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या एस टी.कर्मचार्यांच्या आंदोलनामध्ये भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांनी कर्मचार्यांच्या मागणी व न्याय हक्कांसाठी पंधरा धरणे आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता.
तसेच शेतकरी,साखर कारखान्याच्या उस दर प्रश्नवर,कारखान्यातील कामगारांचे प्रश्न असे समाजातील विविध प्रश्नांवर सातत्यांने रस्त्यावर आंदोलने करुन न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.याचीच दखल घेऊन आ.गोपिचंद पडळकर यांनी एस.टी.कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे.
आमचे नेते आ.गोपिचंद पडळकर यांनी ज्या विश्वासने माझी या पदासाठी निवड केली.या पदाचा एस.टी.कर्मचारी यांचे प्रश्न तसेच समाजतील वंचित घटकांचे प्रश्न सोडविणार असल्याचा विश्वास यावेळी माऊली हळणवर यांनी दिला.
या निवडीनंतर माऊली हळणवर यांच्यावर विविध सामजिक संघटना व राजकीय नेते मडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.