या विकास आराखड्याला माझ्या सहित परिचारक कुटुंबाचा पूर्ण पणे विरोध आहे :- प्रणव परिचारक
प्रतिनिधी : नुकताच शासनाने प्रसिद्ध केलेला पंढरपूर विकास आराखडा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील नव्याने होणारा कॉरिडॉर या विषयासंदर्भात स्थानिक नागरिकांचे घरदार तोडून, स्थानिकांना बाधित करुन हा विकास आराखडा कोणत्याही परिस्थितीत होऊ नये.
हा विकास आराखडा शासनाच्या ज्या मोकळ्या जागा शिल्लक आहेत, त्या जागी करावा, मंदीर परिसरातील स्थानिक रहिवाशांची घरे हेच त्यांच्या उदरनर्वाहाचे साधन आहे तसेच येथे मोठया प्रमाणात व्यापारी वर्ग देखील आहे, त्यांच्या व्यापरा वर त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे, तसेच त्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, हे सगळे करुन शासनाला काय साध्य करायचे आहे.
या विकास आराखड्याला माझ्या सहित परिचारक कुटुंबाचा पूर्ण पणे विरोध आहे, असे मत यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केले.