हायातीचा दाखला सादर करण्याचे ६ ऑनलाईन मार्ग

0
हायातीचा दाखला सादर करण्याचे ६ ऑनलाईन मार्ग 

रकारकडून निवृत्तीवेतन मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत एक काम आवर्जून करावं लागतं...आपलं जीवन प्रमाणपत्र सादर करणे. सोप्या भाषेत याला 'हयातीचा दाखला' म्हणू शकतो.

दरवर्षीचा हा सोपस्कार काही प्रमाणात सोपा होऊ शकतो. याचं कारण म्हणजे तुम्हाला हे जीवन प्रमाण पत्र डिजिटली ही सादर करता येतं. डिजिटल जीवन प्रमाणपत्र  बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करून मिळवता येऊ शकतं.त्यासाठी आधार कार्डशी जोडलेलं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरता येतं.प्रत्येक वेळी हे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या एजन्सीकडे जाण्याची आवश्यकता नाही.

30 सप्टेंबर 2022 ला डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरने एक परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये निवृत्तीवेतनधारक त्यांचं जीवन प्रमाणपत्र सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांच्या 'डोअरस्टेप बँकिंग अलायन्स'च्या माध्यमातून सादर करू शकतात.पोस्टाचीही डिजिटल लाइफ सर्टिफिकेट साधर करण्यासाठी डोअरस्टेप सर्व्हिसचा वापर करता येतो.

6 मार्गांचा वापर करून निवृत्ती वेतनधारक जीवनप्रमाणपत्र सादर करू शकतात.

जीवन प्रमाणपत्र पोर्टलचा वापर करून हयातीचा दाखल कसा सादर करायचा?

या पोर्टलचा वापर करण्यासाठी तुम्हाला जीवन प्रमाण अॅप डाऊनलोड करणं आवश्यक आहे.पेन्शनर्सना UIDAI चा वापर करून फिंगरप्रिंट्सही द्यावे  लागतात.

मोबाईलला फिंगरप्रिंटचं यंत्र जोडण्यासाठी OTG केबलचा वापर करता येतो.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सबमिट करायचं?

नोव्हेंबर 2020 मध्ये डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरने 'डोअरस्टेप सर्व्हिस फॉर सबमिशन ऑफ डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बाय पोस्टमन' हा उपक्रम सुरू केला.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने हा उपक्रम विकसित केला होता.

या सुविधेचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून पोस्टइन्फो अॅप डाऊनलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तसं डाऊनलोड करायचं याची सगळी प्रक्रिया https://youtu.be/eERwM U7g54 या लिंकवर जाऊन पाहता येईल.

डोअरस्टेप बँकिंगचा वापर

सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँका डोअरस्टेप बँकिंगची सुविधा देतात. देशभरातील 100 महत्त्वाच्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या अंतर्गतच जीवन प्रमाणपत्रही उपलब्ध करून दिलं जातं. डोअरस्टेप बँकिंग एजंट तुमच्या घरी येऊन ही सुविधा देतात. मोबाईल अप, वेबसाइट किंवा टोल फ्री नंबरचा वापर करून डोअरस्टेप बँकिंग एजंटला घरी बोलावता येऊ शकतं. वेबसाईट- https://doorstepbanks.com/ https://dsb.imfast.colin/doorstep/lfigin टोल फ्री नंबर- 18001213721, 18001037188

फेस ऑथेंटिकेशनचा वापर

UIDAI आधार सॉफ्टवेअरवर उपलब्ध असलेल्या फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून पेन्शनर त्यांचं जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वापरू शकतात. कोणत्याही अँड्रॉईड स्मार्टफोनवरून संबंधित पेन्शनरचा लाइव्ह फोटो काढायचा आणि तो जीवन प्रमाण मोबाईल अपवर अपलोड करायचा

पोस्टमन अॅट होम

नोव्हेंबर 2020 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या सहाय्याने पोस्ट खात्यानेही डोअरस्टेप सर्व्हिसचा उपक्रम सुरू केला होता.

त्यासाठी पेन्शरने गुगल प्लेस्टोअरमधून पोस्ट इन्फो अप डाऊनलोड करणं आवश्यक आहे. त्यावरून डिजिटली जीवन प्रमाणपत्र सबमिट करू शकतात.

संबंधित अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेल प्रमाणपत्र

पेन्शनर संबंधित अधिकाऱ्याने सही केलेलं जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. त्यासाठी त्यांनी स्वतः हजर राहण्याचीही आवश्यकता नसते. यासंबंधीच्या नियमानुसार, निर्धारित मसुद्यानुसार आणि आवश्यक सहीसह जर एखाद्या पेन्शनरने आपलं प्रमाणपत्र सादर केलं असेल तर त्याला स्वतः उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. या प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी कोणते अधिकारी पात्र असतात याची यादी CAPO च्या पहिल्या परिशिष्टात आहे.





Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !