विनायक मेटे प्रकरणांत चालकावर
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ;
मेटे यांच्या चालकावर हा गुन्हा दाखल झाला आहे. मेटे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या चालकावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मेटे यांचा अपघात झाला तेव्हा चालकाने तातडीने का माहिती दिली नाही, अशा अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. CID कडून विनायक मेटे अपघात प्रकरणात चौकशी सुरु होती.
ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर CID ने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती.
यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे जात होते.
CID चा तपास पूर्ण झाला असून मेटेंच्या कारचा चालक हाच अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. चालक एकनाथ कदमवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. CID ने रसायनी पोलीस ठाण्यात 304 a, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.