पंढरपूर सिंहगडचे प्रा. अक्षय सावंत यांचे गणित विषयातील नेट परीक्षेत यश
पंढरपूर: प्रतिनिधी
जुन २०२२ मध्ये राष्ट्रीय परीक्षा एजेंसी यांच्याकडून घेण्यात आलेल्या CSIR-UGC NET परीक्षेतील गणित विषयामध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये कार्यरत असलेले प्रा. अक्षय सावंत यांनी ८३ वी रँक मिळवून यश प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
त्यांच्या या यशाबद्दल काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. राजेंद्र पाटील, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.