पंढरपूर सिंहगडच्या ८ विद्यार्थ्यांची "ट्रान्सफिक्स" कंपनीत निवड

0
पंढरपूर सिंहगडच्या ८ विद्यार्थ्यांची "ट्रान्सफिक्स" कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी,  पंढरपूर महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
     "ट्रान्सफिक्स" कंपनी ही युरोप मधील कॅहोर्स ग्रुप मधील कंपनी आहे ही कंपनी इलेक्ट्रीकल, वाॅटर, गॅस, टेलिकाॅम आणि ट्रान्सफॉर्मर आदीसह नवीन आधुनिक उत्पादन बनविण्यात अग्रेसर आहे. "ट्रान्सफिक्स" ही कंपनी २६ ऑक्टोबर २००७ रोजी अंतर्भूत झालेली प्रायव्हेट कंपनी आहे. ही गैर-सरकारी कंपनी म्हणून वर्गीकृत आहे आणि रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, पुणे येथे नोंदणीकृत आहे. अशा या कंपनी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शुभम दत्तात्रय मंगळवेढेकर, सुप्रिया दाजी कोळेकर, स्नेहल वंसत पाटणे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील संकेत अर्जुन गायकवाड, शरद आनंद टोणे, सुयश निलकंठ गुजरे, शशीकांत तानाजी गिरी, ऋषिकेश विलास यादव आदी ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे. 
   पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष ज्ञान लक्षात येण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना "प्रकल्प आधारितशिक्षण" दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती समोर येते. संशोधन वृत्तीचा फायदा भविष्यात मुलांना करिअर साठी खुप मोठ्यात प्रमाणात होत असतो. देशातील व परदेशातील नामांकित उद्योगसमूहातील संस्थांसोबत सिंहगडचे अनेक सामाजिक सामंजस्य करार महाविद्यालयाने केले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असावा यासाठी पुरक उपक्रम घेण्यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालय प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व बौद्धीक कौशल्याचा विकास होण्यासाठी असंख्य मुल्यवर्धित कार्यक्रमाचे आयोजन करून महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य आहे यामुळेच आज असंख्य विद्यार्थ्यांचा ओढा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी आहे.
 "ट्रान्सफिक्स" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अभिजित, प्रा. वैभव गोडसे सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !