प्रत्येकाला भेंडी आवडते असे नाही. कारण भेंडी ही चिकट असते. आणि खाताना ती चिकटे म्हणून काही जणांना भेंडी आवडत नाही. भेंडी आवडत जरी नसली तर ती शरीरासाठी खूप चांगली असते. भेंडीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, इत्यादी अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर जाणून घेऊया भेंडी खाण्याचे फायदे.
भेंडीची चव ही फिकट असते, आणि भेंडी ही चिकट देखील असते. पण भेंडीचे सेवन नियमितपणे केल्याने गुडघेदुखी, कंबर दुखी, हात पाय दुखणे अश्या समस्यापासून लगेच आराम मिळतो.
भेंडीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी, कर्करोगापासून बचाव करण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील भेंडी खूप उपयुक्त आहे.
भेंडी आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. भेंडी मध्ये पेक्टिन असते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, तसेच भेंडी मध्ये फायबर, जास्त प्रमाणात असते. जे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाचे विकार होत नाही.
भेंडी सेवन केल्याने अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. त्यात असलेले लोह हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. तसेच भेंडी मध्ये व्हिटॅमिन-के असते जे रक्तस्त्राव थांबविण्याचे काम करते.
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असते. आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.