पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांला वार्षिक ५.२० लाखाच्या पॅकेजची नोकरी
पंढरपूर: प्रतिनिधी
प्लेसमेंट मध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेल्या पंढरपुर सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग मधील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले प्रा. सोमनाथ झांबरे यांना "अलाईड साॅफ्टेक" पुणे या कंपनीकडून साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट या पदासाठी ५.२० लाख वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे.
"अलाईड साॅफ्टेक" ही एक भारतातील अग्रगण्य साॅफ्टवेअर कंपनी असुन, हि कंपनी १९९७ मध्ये स्थापन झाली आहे. या कंपनीकडून विविध प्रकारचे साॅफ्टवेअर डेव्हलप केले जातात. यामध्ये ट्रेडिंग, रुग्णालये, किरकोळ व्यवसाय, हाॅटेलस् यांना साॅफ्टवेअर बनवून देण्याचा काम "अलाईड साॅफ्टेक" या कंपनी करण्यात येते.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी (ता.पंढरपूर) महाविद्यालयात पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेले प्रा. सोमनाथ झांबरे यांची "अलाईड साॅफ्टेक" या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून ५.२० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"अलाईड साॅफ्टेक" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.