ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने नामदेव पायरीजवळ साखर वाटून केला जल्लोष

0
ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने नामदेव पायरीजवळ साखर वाटून केला जल्लोष 

प्रतिनिधी पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस दर प्रश्न गेल्या तीन-चार वर्षांपासून अत्यंत कमी झालेला होता एकीकडे महागाई वाढली होती परंतु उसाचा दर कमी झालेला होता जिल्ह्यातील 44 कारखानदारांची छुपी युती झालेली होती 
शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या संघटना झाल्यामुळे गोची झालेली होती परंतु गेल्या महिन्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत ऊस दर संघर्ष समितीची स्थापना केली संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा भडका उडाला अनेक ठिकाणी ट्रॅक्टर अडवले गेले कारखान्यावरती गेट बंद आंदोलन झाले 
आरटीओ कडून वाहतूकदारांना चाप लावण्याचा प्रयत्न झाला रस्ता रोको आंदोलन झाले तरीही मुजोर कारखानदार दर वाढवायला तयार नव्हते परंतु काल श्री श्री सद्गुरु कारखान्याने 2500 रुपये पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली शेतकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी कारखान्यावरती जाऊन विठ्ठलाचा महाप्रसाद चेअरमन व्हा. चेअरमन यांना देऊन आभार मानले तसेच आज विठ्ठलाला साकडे घालून नामदेव पायरी जवळ साखर वाटून जल्लोष साजरा केला व विठ्ठलाला विनंती केली की या जिल्ह्यातील मुजोर साखर कारखानदारांना सद्बुद्धी दे आणि उसाला पहिली उचल पंचवीसशे रुपये शेतकऱ्यांना मिळू दे असे साकडे घासले 
यावेळी दीपक भोसले, माऊली हळणवर ,समाधान फाटे ,माऊली जवळेकर ,सचिन आटकळे, शहाजान शेख ,शिवराम गायकवाड, सिराज तांबोळी,रुपेश वाघ यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !