सिंहगड मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स असोशिएशन जागरूकता याविषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगविभाग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स या विषयावर असोशिएशन संबंधित असणाऱ्या संधी, शिष्यवृती इ. ची माहिती देण्यायाठी सत्र आयोजन करण्यात आले होते.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात सञात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना सध्याच्या काळाची गरज म्हणून विविध तांत्रिक असोशिएशन संबंधित माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रमोद बिडे आणि प्रा. दत्तात्रय सावंत यांचे मागदर्शन लाभले. प्रा. दत्तात्रय सावंत यांनी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स या असोशिएशन संबंधित मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी या असोशिएन मार्फत घेतले जाणाऱ्या विविध उपक्रमांची आणि उपलब्ध निधीचा वापर करण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. दरम्यान कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, शैक्षणिक सत्रांमध्ये सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी आणि भविष्यात संशोधन कार्याची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अशा असोशिएशन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
या व्याख्यानामध्ये १०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. दत्तात्रय सावंत यांनी समर्पक उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी आणि प्रा. गणेश बिराजदार, प्रा. विनोद मोरे, विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थीनी अवंती कोरे आणि श्रुती दिवटे यांनी केले.