दि. २६ नोव्हेंबर रोजी टीसीएस या कंपनीतर्फे स्वेरीमध्ये ‘कॅम्पस ड्राईव्ह’ चे आयोजन
पदवीधर युवकांसाठी सुवर्णसंधी
पंढरपूर- येत्या शनिवार, दि.२६ नोव्हेंबर रोजी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गत दोन वर्षांमध्ये म्हणजे सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी टीसीएस तथा ‘टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडून ‘कॅम्पस ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात आले आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
स्वेरीमध्ये शनिवार, दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या ‘कॅम्पस ड्राईव्ह’ मधून पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. सदरच्या ‘कॅम्पस ड्राईव्ह’मध्ये बी.कॉम, बी.ए, बी.बी.एफ, बी.बी.आय, बी.बी.ए, बी.बी.एम, बी.एम.एस, बी.एस्सी, बी.सी.ए,बी.सी.एस या अभ्यासक्रमातून सन २०२०-२१ व २०२१-२२ या साली पदवी प्राप्त केलेल्या अथवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या ड्राईव्हचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी या ‘कॅम्पस ड्राईव्ह’चे आयोजन स्वेरीमध्ये करण्यात आले असून या ‘कॅम्पस ड्राईव्ह’मुळे अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. या ‘कॅम्पस ड्राईव्ह’ संबंधी अधिक माहितीसाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या मोबाईल नं.-८६९८३०३३८७, ९९७०२७७१५० व ९८९०४५५७३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आजकाल पदवीचे शिक्षण घेऊन देखील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी नोकरी अभावी बेरोजगार असल्याचे पाहून ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या कंपनीकडून यंदा पदवीधर व पात्र विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. टीसीएसच्या या निर्णयामुळे पदवीधर युवकांमध्ये नोकरीच्या बाबतीत आशा पल्लवीत झाल्या आहेत.