ट्रान्सजेंडर च्या भूमिकेत दिसणार सुश्मिता सेन ;"Taali" चित्रपटाचा फर्स्ट लुक
मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिता सेन 'ताली' या वेब सिरीज मध्ये सुप्रसिद्ध ट्रांसजेंडर (किन्नर) गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून सुष्मिता गौरी सावंत यांचे आयुष्य जगासमोर आणणार आहे. गौरी सावंत या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी ट्रांसजेंडर समुदायाला समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी काम केले आहे.
सुष्मिता सेनने तिच्या येणाऱ्या ताली वेब सिरीज मधील पहिला लुक इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. ताली - बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! या कॅप्शन सह तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ताली वेब सिरीज ची ऑफर सुष्मिताला दिल्यावर तिने लगेच होकार दिला होता. कारण तिला गौरी सावंत पात्र खूप आवडले आहे अशी बातमी समोर येत आहे. गौरी सावंत या 'सखी चार चौघी' ट्रस्टच्या संस्थापक आणि संचालिका आहेत. त्यांनी 2000 मध्ये ट्रान्सजेंडर साठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही संस्था सुरू केली होती. सुष्मिता सेन लवकरच ताली वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तालीचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर सुष्मिता तिच्या लोकप्रिय वेब सिरीज आर्याच्या सीजन 3 वर काम सुरू करणार आहे, अशी बातमी समोर आली आहे.