सिंहगडच्या सिव्हिल मधील २० विद्यार्थ्यांची आय टी कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील २० विद्यार्थ्यांची आय. टी कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील काॅग्निझंट कंपनीत कुमारी जोत्सना राऊत, आबासो माने, सुमित नवले, गणेश वाघमारे यांची निवड झाली असून कंपनीकडून वार्षिक ४ लाख पगार मिळणार आहे. टीसीएस कंपनीत कुमारी शिवाली गाडेकर, महेश पिसे, लखन दुचाळ, प्रद्युम्न शिंदे, योगेश दुचाळ यांची निवड झाली असुन कंपनीकडून ३.३७ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. क्यु स्पायडर कंपनीत स्नेहल भाकरे, सोमनाथ भागडे, संदिप चौगुले व दिपाली शिवणकर या ४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे.
इन्फोसिस कंपनीत कोमल पवार, पुष्पांजली पांढरे, अकिंता पांडे, विशाल देवकर आदी चार विद्यार्थ्यांची निवड झाली असुन कंपनीकडून ३.६० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. ए क्यु एम टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीत राम नागणे यांची निवड झाली असून कंपनीकडून वार्षिक ३ लाख पगार मिळणार आहे. राहुल चव्हाण यांची माईंड ट्री या कंपनीत निवड झाली आहे ४ लाख पगार मिळणार आहे.
संदीप चौगुले याची क्यू स्पायडर या कंपनीत निवड झाली आहे. याशिवाय कुमारी जोत्सना मुरलीधर राऊत हिची काॅग्निझंट, टीसीएस आणि विप्रो या ३ कंपनीत निवड झाली आहे तसेच स्नेहल रमेश भाकरे हिची क्यु स्पायडर, कॅपजेमिनी या दोन्ही कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरींग विभागातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असुन शासकीय व निमशासकीय तसेच प्रा. लिमिटेड आय टी कंपनीत नोकरी हमखास मिळते.
याशिवाय सिव्हिल इंजिनिअरींग विभागात डिग्री बरोबरच सस्टेनॅबीलीटी इंजिनिअरींग, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, डिझास्टर मॅनेजमेंट, डिझाईन अँड डेव्हलपमेंट हे ऑनररी पदवी महाविद्यालयात उपलब्ध आहे. सद्यस्थितीत तांत्रिक प्रगतीमुळे पायाभूत सुविधांची निर्मिती लक्षात घेता सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी या अगणित आहेत. भारतातच नव्हे; तर परदेशात देखील स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी मिळत असल्याचे डाॅ. श्रीगणेश कदम यांना सांगितले.
सिव्हिल इंजिनिअरींग विभागात आय टी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. यशवंत पवार, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.