पंढरपूर सिंहगड मध्ये २७ ऑक्टोबर पासुन अभियांत्रिकीचा प्रवेशाचा राऊंड- २
पंढरपूर: प्रतिनीधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या पदवी अभियांत्रिकीचा कॅप राऊंड टू २७ ऑक्टोबर २०२२ पासुन ऑप्शन फार्म भरण्याची मोफत सुविधा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये सुरू असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाची दुसरी फेरी गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर पासुन होणार असुन हि प्रक्रिया शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार असुन पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये हि सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसर्या फेरीची अलाॅटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही तसेच ज्यांनी प्रथम फेरीत नाॅट फ्रीज अथवा बेटरमेन्ट केले आहे अशा विद्यार्थ्यांना दुसर्या फेरीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये प्रवेशासंदर्भात इच्छुक शाखेत प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता पहिल्या फेरीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील आवडीची ब्रँच मिळाली नसेल किंवा कुठेच पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी दुसर्या फेरीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील इच्छुक ब्रँच चा ऑप्शन फार्म भरू शकतात.
अभियांत्रिकीचा प्रवेश निश्चित करत असताना पालकांनी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे विद्यापीठातील निकाल, आय. टी. कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट तसेच शासकीय सेवेत नोकरी, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, सोई सुविधा, उद्योग क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केले करिअर, महाविद्यालयातील संशोधन, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर आदी बाबींचा लक्षात घेऊन ऑप्शन फार्म भरणे आवश्यक आहे. दुसर्या फेरी नंतर विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर २०२२ दुपारी ३ पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन आवश्यक ती कागदपत्र व ऑनलाईन शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
दुसर्या फेरीत ऑप्शन फार्म भरत असताना काही अडचण निर्माण झाल्यास पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील प्रा. सोमनाथ कोळी-८३७८०१७५४६, प्रा. उमेश घोलप-८०५५१०३७१५ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज वतीने करण्यात आले आहे.