'त्या' मठात अखेर मठाच्या विश्वस्तांनी केला प्रवेश.

0
'त्या' मठात अखेर मठाच्या विश्वस्तांनी केला प्रवेश.              मा. उमेशराव परिचारक यांचे मिळाले पाठबळ ....

          महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी पंढरपूर मधील वैकुंठवासी ह.भ.प. धोंडोपंत दादा अत्रे यांचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या काठावर भव्य मठ आहे. या भजनी सांप्रदायिक फडाचे विश्वस्त यांनी मागील ३ वर्षांपासून होत असलेला विरोध कायदेशीर मार्गाने लढा देवुन मोडीत काढत, नाहक बदनामी करण्यासाठी करण्यात आलेले अनेक बिनबुडाचे आरोप, चिखलफेक यावर मात करत, कायद्याची लढाई संयमाने जिंकत दिवाळीच्या मंगलमय पर्वाच्या पार्श्वभूमीवर मठामध्ये असंख्य अनुयायींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रवेश केला.
          स्वयंखुद्द चौकशी अर्ज क्रमांक ४९ / २०१७ नुसार माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्त सोलापूर यांनी नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ मुंबई उच्च न्यायालयाने कायम केले. युटोपियन शुगर्सचे चेअरमन मा. उमेश परिचारक यांचेही या विश्वस्त सदस्यांना याकामी मोलाचे सहकार्य लाभले. उमेश परिचारक यांनी फडाच्या कार्यकारी मंडळाचे सर्व विश्वस्त यांचे अभिनंदन करून सन्मान केला. व आपल्या कारकिर्दीत भाविक-भक्तांना अध्यात्मिक आनंद, अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर भविष्यात काहीही अडचण आल्यास ठामपणे पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन दिले. विश्वस्तांच्या वतीने अरुणराव पाटील यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी विश्वास देशमुख, तानाजी होळकर, संगप्पा स्वामी, एकनाथ पिंपळणेकर, संतोष पाटील, बाळासाहेब शेळके, शरद बिराजदार, लक्ष्मण शेळके आदी विश्वस्त मंडळींसह विशाल आर्वे, बालाजी कोल्हे, योगेश पिंपळणेकर, गुंडेराव चेवले, माउली मंदाडे, नरेंद्र माने इत्यादी उपस्थित होते.      

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !