पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेची यश
पंढरपूर:
सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग कोर्टी, पंढरपूर येथून उत्तीर्ण झालेल्या २० हुन अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
स्थापत्य अभियांत्रिक विभागातील मदन आवताडे, समाधान जगदाळे, रोहित जगताप, महेश मोरे, प्रितम चोरडे, सद्दाम सय्यद, विनायक बनसोडे, नवनाथ शिंदे, अक्षय माने, संदीप पवार, सारिका महारनवर, सचिन शेंडगे, सारिका खुने, सचिन मस्के पवन पाटील, भाग्यश्री धोन, अजित सावंत आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये महेश मोरे हे सब डिव्हिजनल ऑफिसर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स भारत सरकार या विभागात कार्यरत आहेत. हे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, जलसंधारण विभाग, टाऊन प्लॅनिंग, म्युनिसिपल कार्पोरेशन या विभागात असिस्टंट इंजिनिअर, टाऊन प्लॅनर, सिटी इंजिनिअर, वॉटर कन्सर्वेटिव्ह ऑफिसर, या पदावर कार्यरत आहेत. महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, कॉलेज राबवत असलेले विविध उपक्रम यामुळे स्पर्धा परीक्षेत सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यश संपादन करत आहेत. तसेच २०२१-२२ या बॅचचे १५ हून अधिक विद्यार्थ्यांचे कॉग्निजंट, विप्रो, टिसीएस, कॅप जेमिनी, आयबीएम यासारख्या नामांकित आयटी कंपनीमध्ये प्लेसमेंट झाले आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.