पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये शिक्षण घेत असलेल्या ५ विद्यार्थ्यांची नामांकित असलेल्या "क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीत" कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
"क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनी कार्यप्रदर्शन अभियांत्रिकीत मध्ये अग्रणी आहे. या कंपनीचे दोन हजार प्लस गुणवत्ता आश्वासन सल्लागार भारत, दुबई, मलेशिया, इंडोनेशियन, फिलिपिन्स आणि सिंगापूर आदींसह २० देशांमध्ये "क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रा. लि." कंपनी कार्यरत आहे. अशा या कंपनीत एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील तेजश्री उत्तरेश्वर लोखंडे आणि काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील भाग्यश्री मोरे, सुमेरा शमसुद्दीनशेख शेख, पुनम सावंत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रोहित ननवरे आदी ५ विद्यार्थ्यांची "क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीत" कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असुन कंपनीकडून वार्षिक ३.५० लाखांचे पॅकेज मिळणार आहे.
"क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीत" निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. सुमित इंगोले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.