पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई

0
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई

 एक मालवाहूतक ट्रक सह ४४.५०.००० रू किमतीचा मुद्देमाल ताब्यात

पंढरपूर प्रतिनिधी : नागेश काळे 

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक लाल रंगाच्या मालवाहक ट्रकमध्ये प्रतिबंधीत विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर मार्ग टेंभुर्णीकडे जात असल्याची गोपनीय बातमी मिळालेने पंढरपुर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपुर शहर पोलीस ठा हददीतील अहिल्या पुलाकडे जाणारे रस्त्यावर सापळा रचला. बातमीतील वर्णन मालवाहतुक ट्रक हा रिलायन्स पंपाजवळ आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी ट्रक चालकाकडे मालट्रक मधील मालाबाबत विचारणा केली असता ट्रक चालकाने गाडीमा प्रतिबंधीत असलेला हिरा पान मसाला व सुगंधित तंबाखु असलेवे सांगीतले सदा माल ट्रक एम.एच.०९ सी.ए. ३६३० व त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित व विक्रीस मनाई असलेला गुटबा तसेच मालट्रक चालकास ताब्यात घेवुन सदस्या मुद्देमाल पोलीस ठाणेस आणुन अन्न व औषय प्रशासन यांचेशी संपर्क करून पुढील कार्यवाही करीत आहे.
जप्त करणेत मालट्रक व प्रतिबंधीत केलेला गुटखा एकूण मुद्देमाल खालीलप्रमाणे

१२७,६०,०००/- रु. किंमत अंदाजे हिरा कंपनीचा पान मसाला - १२० पोती

२६,९०,०००/- रु. किंमत अंदाजे रॉयल ७१७ कंपनीची तंबाखु ३)१०,००,०००/- रु किं एक अशोक लेलंड कंपनीचा ट्रक नं एम. एव-०९ सी. ए ३६३० :- ३० पोती

एकूण ४४,५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल चालकासह ताब्यात घेतला.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, श्री. विक्रम कदम सो श्री. अरुण पवार सो, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि सी. ही केंद्र पोसई/ दत्तात्रय आसबे, सपोफी राजेश गोसावी, पोहेकॉ / १०६३ ढेरे, पोहेकॉ / ३९६ सुरज बाडे, पोहेकॉ / ४१९ शरद कदम, पोना/ १७३६, सचिन इंगळे, पोना/४८४ सुनिल बनसोडे, पोना / १६५७ दादा माने, पोना/ ५६२ राकेश लोहार, पोना/१७८९ सचिन बाडे, पोना / १२२८ सुजित जाधव, पोकों / २१९० समाधान माने यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !